
कणकवली : शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ कणकवलीच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ३५ अर्ज दाखल झाले. त्यामुळे १५ जागांसाठी दाखल झालेल्या अर्जांची संख्या ४६ झाली आहे. दाखल झालेल्या अर्जांनुसार भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (मविआ) यांचे उमेदवार रिंगणात असल्याचे चित्र दिसत आहे. शुक्रवार दि. १८ रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे.
गुरूवारी दाखल झालेल्या अर्जांमध्ये प्राथमिक शेती संस्था मतदारसंघातून राजेंद्र राणे, रविकांत सावंत, अतुल दळवी, सुभाष जाधव, श्रीपत पाताडे, विठ्ठल देसाई, संजय शिरसाट, रघुनाथ राणे, सुरेश ढवळ, दिलीप तळेकर, गणेश कुबल, तुळशिदास रावराणे, वसंत तेंडुलकर असे १३ तर बुधवारी दाखल झालेले ७ असे एकूण २० अर्ज दाखल झाले आहेत.
व्यक्ती मतदारसंघातून प्रकाश सावंत, सुभाष सावंत, मंगेश सावंत, गुरूप्रसाद वायंगणकर, सुधीर सावंत, राकेश राणे असे सहा व बुधवारी दाखल झालेले तीन असे एकूण नऊ अर्ज दाखल झाले आहेत. इतर संस्था मतदारसंघातून श्रीकांत राणे, मिथील सावंत, शांताराम राणे, सुरेंद्र कोदे व सुशिल पारकर असे पाच अर्ज दाखल झाले आहेत. इतर मागास प्रवर्गामधून मंगेश तळगांवकर, सदानंद हळदिवे, उमेश वाळके, महिला राखीवमधून स्मिता पावसकर, श्रद्धा सावंत, स्वरूपा विखाळे, सुधा हर्णे, लिना परब, भटक्या जाती /विमुक्त जमाती विशेष मागास प्रवर्गामधून विनीता बुचडे, जयेश धुमाळे असे दोन अर्ज तर अनु. जाती, जमातीमधून गणेश ताबे यांचा एक अर्ज तर बुधवारी दाखल झालेला एक अर्ज असे एकूण दोन अर्ज दाखल झाले आहेत.
येथील सहकारी संस्था सहनिबंधक के. आर. धुळप यांच्याकडे हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. तरी शुक्रवार १८ रोजी उमेदवारी अर्जांची छननी होणार आहे.