
चिपळूण : सावर्डे येथील वाढत्या लोकवस्त्यांमुळे भिषण पाणी टंचाई जाणवत असते. वर्षानुवर्षे येथील जनतेला भेडसावणारा पाणी प्रश्न आमदार शेखर निकम आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रयत्नांतून कायमचा सुटणार अशी अपेक्षा आहे. शासनाच्या लघु पाटबंधारे विभागाची सावर्डेतील लघु पाटबंधारे धरण हे अनेक वर्षाचे स्वप्न होते. गावात प्रकल्प व्हावा गावातील पाण्याचे दुर्मिक्ष दूर व्हावे , म्हणून अनेेकांनी प्रामाणिक प्रयत्न केले होते. मात्र यश मिळत नव्हते. आमदार शेखर निकमांच्या प्रयत्नांना आणि सचिन पाकळे यांनी कागदपत्रांची पूर्तता करत प्रस्तावाला चालना दिली . परिसरातील जनतेची आणि पदाधिकाऱ्यांची साथ मिळाल्याने प्रकल्पाला मंजुरी मिळाली.
'' चिपळूण तालुक्यातील सावर्डे परिसरातील हे धरण ५ वर्षात न झाल्यास आपण राजकारणातुन बाहेर पडू'' अशी अजित दादांकडे निर्वाणीची अर्जी केली होती. अखेर अजित दादांनी शेखर निकमांंच्या निर्वाणीच्या विनंतीची दखल घेत. सुमारे ८५ कोटीच्या या प्रकल्पास मंजूरी दिली आहे. या यशाचे श्रेय उपमुख्यमंत्री अजितदादा आणि केदारनाथ देवाची कृपा असल्याचे आमदार निकम यांनी सांगून, प्रकल्पासाठी जमीनी दिलेल्या ग्रामस्थांचे आभार मानत या धरणाच्या प्रकल्पामुळे सावर्डेसह , परिसरातील मांडकी, ओमळी, दहीवली पालवण आदी ४० गावांचा पाणी प्रश्न कायमचा मिटणार आहे. या धरणाच्या पाण्यामुळे येथील पर्यटन विकास होणार आहे. सावर्डे परिसर सुजलाम सुफालम होईल असे मत आमदार निकम यांनी या धरणाच्या भूमीपूजन कार्यक्रमाचे निमित्ताने व्यक्त केले.
हे पाझर धरण ५४० मीटर लांब, ३२ मीटर उंच असून, या धरणामुळे २१३ हेक्टर जमीनीचे क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पाचे काम, येथील स्थानिक ठेकेदार, तिरूपती कन्स्ट्रक्शन कंपनी, सावर्डे करणार आहे. या भुमिपूजन कार्यक्रमास, तिरुपती कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक, संजय पाकळे ,सचीन पाकळे, जलसंधारणचे सागर भराडे, केतन पवार,सावर्डेच्या सरपंच सौ. समीक्षा बागवे, उपसरपंच जमीर मुल्लाजी, शरद चव्हाण, अंकिता सावंत, साजन कुरुसिंगल ,सचिन कोल्हपुरे , अमित सर्व्हे, समीर काझी ,उमेश राजेशिर्के,संतोष खैर, नितीन चव्हाण , सुभाष मोहिरे, शांताराम बागवे, सूर्यकांत चव्हाण, संजय चव्हाण, सुनील चव्हाण, माऊली चव्हाण, तुकाराम साळवी, विजय भुवड सावर्डे येथील ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.