सिंधुरत्न जॉब फेअरमध्ये 4 हजार 829 तरुणांना जागेवर जॉब !

नोकरी देणाऱे हात निर्माण करा : विशाल परब
Edited by: भरत केसरकर
Published on: January 12, 2024 12:27 PM
views 230  views

सावंतवाडी : नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणाऱे हात निर्माण करा.अशा नोकरी देणाऱ्या हातांचे कौतुक करायला आम्ही सदैव तत्पर आहोत.एकीकडे नोकऱ्या नाहीत असे सगळे सांगत असताना विशाल परब आणि  भारतीय जनता पार्टी यांनी आज तब्बल दहा ते पंधरा हजारापेक्षा जास्त युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विशाल परब यांनी आज जो जॉब फेअर आयोजित केला आहे. हे कार्य कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या जाॅब फेअर चे उद्घाटन करण्यात आले.  यावेळी व्यासपीठावरून रविंद्र चव्हाण बोलत होते.  युवकांना खरी साथ देण्याचे काम या माध्यमातून होत असताना आपल्याला विशाल परब व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे खास आपण अभिनंदन करत आहोत. असेही रवींद्र चव्हाण यावेळी बोलताना म्हणाले.


यावेळी भाजपचे कुडाळ विधानसभा मतदारसंघ प्रमुख निलेश राणे,सावंतवाडी विधानसभा प्रमुख माजी आमदार राजन तेली, भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजू परब, मनोज नाईक, युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रयास भोसले, कुडाळ तालुकाध्यक्ष दादा साईल, माजी जि. प. उपाध्यक्ष रणजित देसाई, प्रभाकर परब, युवा हब चे दीपक पवार, किरण रहाणे, जावेद खतीब, माजी नगरसेवक गुरु मठकर, केतन आजगांवकर, तेजस माने, दिलीप भालेकर आदी उपस्थित होते.


सकाळपासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद !

सावंतवाडी येथील जिमखाना मैदानाच्या दिशेने हजारो तरुण तरुणींचे पाऊले सकाळपासूनच वळू लागली होती. विशाल परब आयोजित सिंधुरत्न जाॅब फेअरला सकाळ पासूनच नोकरीसाठी बेरोजगारांची गर्दी पाहायला मिळाली.सकाळपासून सिंधुदुर्ग,रत्नागिरी,कोल्हापूर जिल्ह्यासह गोवा राज्यातील युवक-युवती मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण,माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत तसेच भाजप नेत्यांच्या उपस्थितीत या जॉब फेअर चे उद्घाटन झाले.

       

160 हून अधिक कंपन्यांचा सहभाग

 

 रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बेरोजगार युवक युवतींसाठी युवा नेते तथा भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब याने सिंधूरत्न जॉब च्या माध्यमातून नोकरीची संधी आज जिमखाना मैदानाच्या ठिकाणी उपलब्ध करून दिली. या जॉब फेअर मध्ये तब्बल 160 हून अधिक कंपन्या सहभागी झाले होत्या.शिवाय मोठ्या संख्येने या जॉब फेरला युवक युवतींनी नाव नोंदणी केली होती. त्यामुळे या जॉब फेअर च्या माध्यमातून अनेकांच्या हाताला काम देण्याचा विशाल परब यांचा प्रयत्न होता.  महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या जॉब फेअर चे उद्घाटन झाले. सकाळपासूनच युवकांची पावले या जॉब फेअरच्या ठिकाणी म्हणजे जिमखाना मैदानावर वळू लागले होते. एकूणच या जॉब फेअरला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे यातून दिसून येत होते.विशाल परब यांच्यासह भाजपची संपूर्ण टीम या जाॅब फेअर साठी जोरदार मेहनत घेतली.


आम्हाला रोजगार द्यायचा आहे : निलेश राणे


ब्रिटिशांनी पुढील कित्येक वर्षांचा विचार करून नियोजनबद्ध पद्धतीने मुंबई शहर वसवलं होतं. त्याचा फायदा आज आपण घेत आहोत. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच आम्ही सर्वजण पुढील भविष्यकाळाचा विचार करून या जिल्ह्यात 'शाश्वत रोजगार ' उपलब्ध होण्यासाठी प्रयत्नशील आहोत. जेणेकरून येथे अशा पद्धतीने रोजगार उपलब्ध व्हावा की त्यासाठी अशा प्रकारे रोजगार मेळावे घेण्याची वेळ येऊ नये या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत. विशाल परब, युवा मोर्चा व भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून घेण्यात आलेला हा रोजगार मेळावा अतिशय सुत्य उपक्रम आहे, अशा शब्दांत भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा कुडाळ विधानसभा प्रमुख माजी खासदार निलेश राणे यांनी सिंधुरत्न रोजगार मेळाव्याच्या योजना बद्दल विशाल परब त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.


       सावंतवाडी जिमखाना मैदान येथे भाजपायुवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब, भाजपा सिंधुदुर्ग रत्नागिरी तसेच भाजपा युवा मोर्चा यांच्या माध्यमातून आयोजित 'सिंधुरत्न जॉब फेअर' या भव्य रोजगार मेळाव्याला माजी खासदार निलेश राणे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्याहस्ते मेळाव्यात निवड झालेल्या काही उमेदवारांना नियुक्तीपत्रे व जॉब कार्ड वितरित करण्यात आली.

     सिंधुदुर्ग जिल्हा सह कोकण प्रदेश हा शेतीप्रधान आहे. मात्र, येथील तरुणांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेतीपूरक व्यवसायांच्या माध्यमातून रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आम्ही देखील भाजपच्या माध्यमातून या भागात प्रदूषण न होणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून शाश्वत रोजगार कशाप्रकारे उपलब्ध होईल यासाठी प्रयत्नशील आहोत. 

        केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाच्या माध्यमातून सी वर्ल्ड सरकार महत्वकांक्षी प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न केले. आडाळी एमआयडीसी, रेडी पोर्ट, चिपी विमानतळ यासारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून या भागाचा शाश्वत विकास होऊन येथे विविध कंपन्यांच्या माध्यमातून कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न केले. त्याच पार्श्वभूमीवर भविष्यातही अशा प्रकारचे प्रयत्न आम्ही करणार आहोत,  अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.


विशाल परब व सहकाऱ्यांनी केलेले आयोजन स्तुत्य :  निलेश राणे

     विशाल परब व त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांनी या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून केलेले आयोजन अत्यंत स्तुत्य आहे. आपल्या जिल्ह्यात 'रोंबाट स्पर्धा ' घेताना अनेकांना पाहिले होते मात्र भारतीय जनता पार्टी सारखा पक्ष येथील बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी असे रोजगार मिळावे घेत असतो. यापूर्वी कुडाळ मध्येही रोजगार मिळावा घेण्यात आला होता. त्यातूनही अनेक युवकांना रोजगार उपलब्ध करण्यात आले होते. या मेळाव्यातूनही सुमारे दीडशे कंपन्यांच्या माध्यमातून वीस हजारहून अधिक युवकांना रोजगार उपलब्ध होईल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

 साहेब ! तुम्ही फक्त आशीर्वाद ठेवा : विशाल परब

       साहेब ! तुम्ही फक्त आशीर्वाद ठेवा असे विशाल परब यांनी बोलताना मत व्यक्त केले.तुम्ही दिलेले सर्व कार्य आम्ही यशस्वीरितीने पार पाडू असा शब्द विशाल परब यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना दिला. सावंतवाडी येथे आयोजित सिंधुरत्न जॉब फेअर २०२४ चे उद्घाटन आज पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले.

 यावेळी युवा नेते विशाल परब म्हणाले की, हा रोजगार मेळावा ६ महिन्यांपासून तयारी सुरू आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व कार्ये करण्यास भाजप युवा मोर्चा आघाडीवर असेल.

 आम्ही या जॉब फेअरच्या नियोजनात करण्यास कमी पडणार नाही. आजचा कार्यक्रम संध्याकाळी ६ पर्यंत असेल. वेळ पडली तर वेळही वाढवू. येथे ऑफिस सुरू करून ज्यांना नोकऱ्या मिळणार नाहीत त्यांना भविष्यात त्या मिळवून देणार.असेही विशाल परब म्हणाले.....


एवढ्या तरुणांना जागेवर जॉब !

 सिंधुरत्न जॉब फेअर 2023 च्या माध्यमातून  तरुण-तरुणीसाठी भा.ज.यु.मोर्च्या च्या वतीने विशालजी परब यांच्या संकल्पनेतून भव्य रोजगार मेळावा संपन्न झाला. या मेळ्यामध्ये 10312 मुला मुलींनी नोवनोंदणी केली होती, त्यात 8853 तरुण-तरुणींनी सहभाग सोबत नोंदवला.सदर रोजगार मेळाव्या मध्ये  7340 मुला-मुली मुलाखतीला सामोरे गेले. तर  4829 मुला-मुलींचे जागेवरती नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली. त्यापैकी उरलेल्या 2511 मुला-मुलींना जॉब कार्डचे   वाटप करण्यात आले.