
कणकवली : विजेचा लोळ अंगावरून गेल्याने साळीस्ते येथील पांडुरंग नारायण गुरव यांचा गेला आठवड्यात मृत्यू झाला होता. नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीला राज्य शासनाच्या एसडीआएफच्या माध्यमातून मदत देण्यात येते. त्यानुसार त्यांच्या पत्नी श्रीमती प्रेमलता पांडुरंग गुरव यांना ४ लाखांचा धनादेश तहसीलदार आर. जे. पवार यांनी साळीस्ते येथे जाऊन प्रदान केला. यावेळी माजी जि.प. सभापती बाळा जठार, माजी सभापती दिलीप तळेकर व इतर उपस्थित होते.