4 कातकरी कुटुंबियांना भूखंड खरेदीखत प्रदान

आ. निलेश राणेंचे विशेष प्रयत्न
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: July 31, 2025 20:35 PM
views 147  views

मालवण : आमदार निलेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून मालवण तालुक्यातील 29 भुमिहीन कातकरी कुटुंबांना प्रधानमंत्री जन मन आवास योजनेतून घर बांधणीसाठी भूखंड उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरु आहे. दरम्यान काही कातकरी कुटुंबियांच्या नावे  झालेले भूखंड खरेदीखत आमदार निलेश राणे यांनी गटविकास अधिकारी शाम चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केले

मालवण तालुक्यातील 29 लाभार्थ्यांना घर बांधणीसाठी प्रत्येकी 2 लाख रुपये अनुदान प्रधानमंत्री जन मन आवास योजनेतून मिळणार आहे. अशी माहिती मालवण पंचायत समिती गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी दिली आहे. 

आमदार निलेश राणे यांनी कुंभारमाठ येथे कातकरी कुटुंबियांची भेट घेतली. तसेच मालवण पंचायत समिती येथेही वडाचापाट येथील कातकरी कुटुंबियांची भेट घेतली. गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्याकडून योजनेच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना उपनेते संजय आग्रे, उपजिल्हा प्रमुख विश्वास गावकर, उपजिल्हा प्रमुख अरविंद करलकर, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, मालवण शहर प्रमुख दीपक पाटकर, कुंभारमाठ उपसरपंच जिवन भोगावकर, संजय लुडबे, विभागप्रमुख मंदार लुडबे, अरुण तोडणकर, सूरज बिरमोळे, दत्तात्रय नेरकर आदी उपस्थित होते. 

कुंभारमाठ येथील 22 गुंठे शासकीय भूखंड प्रस्तावित

कुंभारमाठ शासकीय तंत्रनिकेतन नजिक 22 गुंठे शासकीय भूखंड 25 कातकरी कुटुंबियांना प्रधानमंत्री जन मन आवास योजनेसाठी मिळावा यासाठी प्रस्ताव तालुका व प्रांत स्तरावरून जिल्हाधिकारी स्तरावर मंजुरीसाठी पाठविण्यात आला. याठिकाणी 25 कुटुंबांना हक्काचे घर उभारून दिले जाणार आहे. त्यासाठी आमदार निलेश राणे यांचे विशेष लक्ष दिले आहे. तर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, प्रकल्प संचालक रवींद्र पाटील यासह सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे सहकार्य लाभत आहे अशी माहिती गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी दिली.  

वडाचा पाट येथील 4 कातकरी कुटुंबियांना भूखंड : 

वडाचा पाट येथील 4 कातकरी कुटुंबियांना प्रधानमंत्री जन मन आवास योजनेतून घर बांधणीसाठी आमदार निलेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून भूखंड उपलब्ध करून देण्यात आला आहे. नारायण पवार, संग्राम पवार, महेश पवार, नितेश पवार या वडाचापाट येथील 4 कातकरी कुटुंबियांना मोहन गिरगवाकर, ललिता घाडी, प्रतिभा घाडीगावकर, दर्शना घाडी, श्रुतिका घाडी, अशोक गिरगांवकर, यांच्या माध्यमातून हा भूखंड प्राप्त झाला आहे. 4 कातकरी कुटुंबियांच्या नावे केलेले खरेदीखत आमदार निलेश राणे यांनी दुय्यम निबंधक प्रवीण हिंदळेकर यांच्या उपस्थितीत गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केले. याकामी तहसीलदार वर्षा झालटे यांचे सहकार्य लाभले असे गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी सांगितले.