
सिंधूदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेची ३६ वी वार्षिक सभा ३० जुलै रोजी ओरोस येथील संस्थेच्या इमारतीमध्ये होत आहे. यावेळी संस्थेमार्फत सभासदांच्या गुणवंत मुलांचा गुणगौरव केला जाणार आहे. यामध्ये तालुकास्तरावर गुणानुक्रम दिला जाणार आहे. ज्या सभासदांची मुले 2023 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी ., बारावी तसेच इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये 60 टक्के पेक्षा अधिक गुण मिळवले असतील अशा सर्वोच्च तीन विद्यार्थ्यांचा गुणगौरव यावेळी करण्यात येणार आहे.
संस्थेला यावर्षी आडीत वर्ग अ मिळाला असून एकूण नफा २ कोटी ८१ लाख ८२ हजार रुपये झाला आहे. सभासदांना १५ टक्के लाभास देण्याची शिफारस करण्यात आली आहे. गेल्या ३६ वर्षात 28 हजारावरून खेळते भागभांडवल 122 कोटी वर आलेले आहे. त्यामध्ये 83 कोटीच्या सभासदांच्या ठेवी आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष भाग्यवंत वाडीकर यांनी दिली. त्याचप्रमाणे सभासदांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरवासाठी जास्तच जास्त नावे पाठवावी असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष वासुदेव वरवडेकर यांनी केले आहे.