
दोडामार्ग : हेवाळे येथील सुरज दौलत राणे, वय ३३ यांचे बुधवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले. अकाली निधनाने हेवाळे पंचक्रोशीत व त्याच्या मित्र परिवारात हळ हळ व्यक्त होत आहे.
सूरज याला बुधवारी सकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी साटेलीभेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले तिथून ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग येथे आणण्यात आले. पुढील अधिक उपचारासाठी नेत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यातच त्याचे निधन झाले. सूरज हा मनमिळाऊ स्वभावाचा होता. तो आपला हॉटेल व्यवसाय सांभाळून काजू बागायतीत लक्ष द्यायचा. दोन वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. त्याच्या पश्चात पत्नी, आईवडील, भाऊ, भावजया, काका, काकी असा मोठा परिवार आहे. ऐन उमेदीच्या तरुण वयात असताना सूरज याच्या आकस्मिक निधनाने कुटूंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
उ.बा.ठा. शिवसेना माजी उपतालुकाप्रमुख दौलत राणे यांचा तो मुलगा तर युवासेना पदाधिकारी संदेश राणे यांचे सख्खे बंधू तर मदन राणे यांचे चुलत बंधू होत. बुधवारी सायंकाळी हेवाळे येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दोडामार्ग तालुक्यातील विविध पक्षांचे राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, नातेवाईक यांनी राणे कुटूंबियांचे सांत्वन केले.