गावराई साई मंदिर वर्धापनदिनी ३२ रक्तदात्यांनी केले रक्तदान

Edited by:
Published on: May 04, 2024 10:04 AM
views 57  views

सिंधुदुर्ग : साई मंदिर वर्धापन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरामध्ये ३२महिला युवक रक्तदात्यांनीरक्तदान केले यात शिवाजी कृषी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता गावराई साई मंदिर येथे साई मंदिरच्या पंधराव्या वर्धापन दिनानिमित्तरक्तदान शिबिरांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

वर्धापन दिनाच्या औचित त्याने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन साई मंदिर चे संस्थापक या सल्लागार शेखर वालावलकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले यावेळीअध्यक्ष हरीचंद्र वायंगणकर , उपाध्यक्ष भाईराणे ,सचिव संजय वालावलकर  ,सल्लागार महेश परुळेकर  ,सदस्य संजीवनी पडते ,शरद यादव , गायत्री परुळेकर आदींसह संस्थेचे पदाधिकारी साई भक्त रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळी ९ वाजल्यापासून ११.३० वाजेपर्यंतराज्य रक्त संक्रमण परिषद सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय यांच्यावतीने रक्तदान शिबिरआयोजित केल्या या शिबिरासाठी छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या १४ विद्यार्थ्यांनी योगदान दिले साई मंदिर येथे या रक्तदान शिबिरा बरोबर पालखी मिरवणूक ,होम मिनिस्टर रेकॉर्डर स्पर्धा , होमवन  , सत्यनारायण महापूजा  ,महाप्रसाद , साई दिंडी आणि दशावतार आदींसह विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले या कार्यक्रमासाठी अनेक भाविक साई भक्तांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन साईबाबांचे दर्शन घेतले मोठ्या उत्साहात भक्तीमय वातावरणात साई मंदिर वर्धापन दिन आणि रक्तदान शिबिर पार पडले.