
दोडामार्ग : साटेली - भेडशी वरचा बाजार येथील तीन दुकानातील रक्कम भुरट्या चोरांनी लंपास केल्याची घटना आज मंगळवारी सकाळी उघडकीस आली. दरम्यान सोमवारी रात्री पाऊस व काळोखा चा फायदा घेत अज्ञात चोरट्यानी हॉटेल व पान पट्टी चे गाळे तोडून आतमधील रक्कम लंपास केल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु होता या वावसाचा आश्रय घेत वरचा बाजार येथील एक पान स्टॉल, दोन हॉटेल मध्ये सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यानी शिरकाव केला. त्यांनी दुकानाचे गल्ले फोडले यामध्ये त्यांना रक्कम मिळाली. शे दोनशे रुपयांची चिल्लर घेऊन गेलेले चोर भुरटे असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या चोरट्याचा बंदोबस्त करण्यासाठी शोध मोहीम घेणे आवश्यक असून बाजारपेठेतील बंद सीसीटीव्ही कॅमेरे दोडामार्ग पोलिसांनी सुरु करण्याची मागणी येथील व्यवसायिकानी केली आहे.