
वेंगुर्ला : सिंधुदुर्गात नुकत्याच नगरपालिका निवडणूका पार पडल्या.यात प्रामुख्याने शिंदे शिवसेना विरुद्ध भाजप या दोन्ही मित्रपक्षामध्ये थेट लढत पाहायला मिळाली. दरम्यान या निवडणुका झाल्यानंतर वेंगुर्ल्यात शिंदे शिवसेनेच्या ३ प्रमुख पदाधिकाऱ्यांचे एकापाठोपाठ एक तडकाफडकी राजीनामे दिले आहे. यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे.
वेंगुर्ले तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, महिला तालुकाप्रमुख दिशा शेटकर, उपजिल्हाप्रमुख सुहास कोळसुलकर यांचे आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. पक्षाला पुरेशा वेळ देऊ शकत नसल्याचे कारण देत दिले राजीनामे देण्यात आले आहेत.










