वेंगुर्ल्यात उद्या ३ कोटी ५७ लाखांच्या विकास कामांची भूमिपूजने

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती
Edited by: दिपेश परब
Published on: February 09, 2024 14:31 PM
views 169  views

वेंगुर्ला : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मंजूर वेंगुर्ले शहरातील सुमारे ३ कोटी ५७ लाखांच्या विकासकामांची भूमीपूजने उद्या दिनांक १० फेब्रुवारी रोजी दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहेत. तसेच यावेळी विविध कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश होणार असून सायंकाळी मांडवी खाडी येथे कॉर्नर सभा संपन्न होणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी दिली आहे. 

उद्या दुपारी ३ वाजता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे सप्तसागर येथील शिवसेना पक्ष कार्यालयात आगमन होणार असून याठिकाणी अनेक कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यानंतर दुपारी ३.३० वाजता कॅम्प येथील नगरपरिषद जलतरण तलावाचे विकसन करणे या ५१ लाख ९३ हजार ६८२ रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन, दुपारी ३.४५ वाजता फळ संशोधन केंद्र गडगा (पोलीस ठाण्या समोर) ते समीर गेस्ट हाऊस पर्यंत जाणारा रस्ता रुंदीकरणासह डांबरीकरण या ४५ लोखांच्या विकासकामाचे भूमिपूजन, सायंकाळी ४  वाजता वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील पाणी पुरवठा योजना सुधारित करण्यासाठी शहरातील अस्तित्वात वितरण वाहिन्या नव्याने घालणे (पहिला टप्पा) या १ कोटी १ लाख ५९ हजारांच्या विकास कामाचे भूमिपूजन, सायंकाळी ४.१५ वाजता नगरपरिषद हद्दीतील इम्युलेट कनसेप्शन चर्च वेंगुर्ला स्मशानभूमी सुशोभीकरण करणे या ३० लाखांचा विकास कामाचे भूमिपूजन, सायंकाळी ४.३० वाजता, आईस फॅक्टरी ते गिरगोल फर्नांडिस (गजीबो) पर्यंत जाणारा रस्ता डांबरीकरण करणे या सुमारे ५३ लाख ६७ हजार रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन, सायंकाळी ५ वाजता वेंगुर्ला झुलता पूल ते बंदर पर्यंत जाणार रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे या सुमारे ७५ लाखांच्या विकासकामाचे भूमिपूजन होणार आहे. यानंतर मांडवी खाडी या ठिकाणी कॉर्नर सभा घेण्यात येणार असून उपस्थितांना दीपक केसरकर संबोधित करणार आहेत. तर यावेळी शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर व शहरप्रमुख उमेश येरम यांनी केले आहे.