ओरोस महाविद्यालयात शारदोत्सवानिमित्त रक्तदान शिबिरात २८ जणांनी केलं रक्तदान..!

Edited by:
Published on: October 23, 2023 12:08 PM
views 59  views

सिंधुदुर्गनगरी : मुंबई विद्यापीठ संलग्न कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय ओरोस खर्येवाडी येथील महाविद्यालयात  शारदोत्सवानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना आणि आजीवन अध्ययन विस्तार विभागामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन 21ऑक्टोबर रोजी  करण्यात आले होते..

दरम्यान या शिबिरात 28 जणांनी केले रक्तदान या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश जैतापकर यांनी अनमोल मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य पंढरीनाथ सावंत यांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित केले.

शिबीर यशस्वी करण्यासाठी एन एस एस विभाग प्रमुख प्रा. वैभव कदम, आजीवन अध्ययन विभाग प्रमुख प्रा.प्रियांका चोरगे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.धनंजय तिवरेकर, प्रा.सुभाष बांबुळकर,प्रा.सरीता झेमणे,प्रा.नम्रता रासम,व शिक्षकेतर कर्मचारी राहुल कदम व नितीन कसालकर, दीपक चव्हाण यांचे सहकार्य केले.रक्तदान शिबिरासाठी एस.एस. पी. एम. मेडिकल कॉलेज आणि लाईफ टाईम हॉस्पिटलचे मनीष यादव व सहकारी सहकारी प्रतिक सद्गीर ,अक्षता केळकर,अनुराधा केळूसकर,राधिका राऊळ, स़ंतोष जाधव उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी सूत्रसंचालन प्रा.सोमकांत केळूसकर, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.प्रचिती पिळणकर यांनी‌ केले.