शिवसेनेतर्फे कणकवलीत 27 ला जिल्हास्तरीय महिला - पुरुष गट नारळ लढविणे स्पर्धा

स्पर्धेत सहभागी होण्याचे तालुकाप्रमुख भूषण परुळेकर यांचे आवाहन
Edited by: उमेश बुचडे
Published on: August 24, 2023 15:15 PM
views 56  views

कणकवली : शिवसेना तालुका कणकवली व कणकवली शहर शिवसेना आयोजित जिल्हास्तरीय महिला गट व पुरुष गट नारळ लढविणे स्पर्धा रविवार 27 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वा.छत्रपती शिवाजी महाराज चौक, कणकवली येथे आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक : ५०००/- रुपये,द्वितीय पारितोषिक : ३०००/-,तृतीय पारितोषिक : २०००/- ठेवण्यात आले आहे.या स्पर्धेसाठी स्पर्धकांनी नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. महिला गट साठी मोफत प्रवेश व पुरुष गट १००/- रुपये फी आहे.आयोजकांनी उपलब्ध केलेला नारळ स्पर्धकांनी वापरायचा आहे.

सर्धेसाठी नाव नोंदणी संपर्क :

१) प्रशांत वनस्कर 9404921921

२) विश्राम सावंत :7588459818

3) प्रिया टेंबकर : 9403066186

४) श्रेया टकले : 9096953371

यांच्याकडे नावे नोंदवावीत व स्पर्धकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना तालुका कणकवली यांच्यामार्फत करण्यात आले आहे.