
मालवण : मालवण तालुक्यातील सर्व हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज मध्ये दहावी, बारावी (शाखा निहाय प्रथम ३) परीक्षेत प्रथम तीन क्रमांक प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आमदार वैभव नाईक व युवासेना मालवणच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
शनिवार २२ जून रोजी दुपारी ३.००. वाजता आर जी चव्हाण हॉल वायरी रोड तानाजी नाका येथे हा गुणगौरव सोहळा संपन्न होणार असून आमदार वैभव नाईक, उपनेत्या जान्हवी सावंत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, नितिन वाळके, शहरप्रमुख बाबी जोगी, मंदार केणी, महिला उपजिल्हा संघटक सेजल परब, देवयानी मसुरकर, महिला तालुकाप्रमुख श्वेता सावंत, दीपा शिंदे, तालुका समन्वयक पूनम चव्हाण, शहरप्रमुख रश्मी परुळेकर, युवतीसेना शिल्पा खोत, युवासेना तालुकाप्रमूख मंदार गावडे, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, युवतीसेना तालुकाप्रमुख नीनाक्षी शिंदे, शहरप्रमुख सूर्वि लोणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे. मालवण तालुक्यातील सर्व शासकीय व खाजगी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज मध्ये दहावी बारावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांनी गुणगौरव सोहळ्याला उपस्थित रहावे असे आवाहन मालवण तालुका युवासेनेच्या वतीने करण्यात आले आहे.