सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील रस्त्यांच्या कामांसाठी २२ कोटी १० लाख निधी मंजूर | मंत्री दीपक केसरकर यांची माहिती

Edited by: विनायक गावस
Published on: July 13, 2023 20:43 PM
views 151  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन बैठकीमध्ये जिल्ह्यातील अत्यावश्यक रस्त्यांच्या कामांचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. स्थानिकांनी सूचविलेल्या या कामांचे प्रस्ताव मंजूर होण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठपुरावा केला. त्यानुसार सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील रस्ते कामांसाठी २२ कोटी १० लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.  मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.


सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील आंबोली गेळे कावळेशेत पॉईंट रस्ता, सांगेली सनमटेंब रस्ता, वजराट देवसू कामळेवीर रस्ता, दाभोली ते वायंगणी रस्ता, चौकुळ ते कशाचीवाडी रस्ता, फुकेरी हनुमंतगड ते चौकुळ-कशाचीवाडी रस्ता अशा ग्रामीण भागीतील सहा रस्त्यांसाठी हा निधी मंजूर झाला आहे. रस्ते विकासाचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे स्थानिकांकडून या कामाचे कौतुक होत आहे.