
सावंतवाडी : माठेवाडा येथील अब्दुल रझाक (वय वर्ष 55) आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट, आपल्या परिवाराचा उदरनिर्वाहासाठी सावंतवाडी आठवडा बाजारामध्ये तलावाच्या काठी फळ विक्रीचा व्यवसाय करत होते. त्यादिवशी त्यांना अचानक चक्कर येऊन तो तलावाच्या वीस फूट खाली मोठी खडप असलेल्या सांडव्यात पडला. त्याच्या डोक्याला व कंबरेच्या खाली भागाला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली होती. सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी व सोहाब बेग यांनी त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबुळ हॉस्पिटलमध्ये पाठवलं होतं. सदर फळ विक्रेता मृत्यूची झुंज देता देता अखेर काल रात्री त्याची प्राणज्योत मालवली.
आठवडा बाजार नेहमीच या ठिकाणी भरवला जातो परंतु अशा प्रकारच्या दुर्घटना पुन्हा होऊ नये यासाठी नगर परिषदेने पुढाकार घेऊन या ठिकाणी रॅलींग बसवावे असे आवाहन सावंतवाडी नगरपरिषदेला सामाजिक बांधिलकी संघटनेमार्फत करण्यात येत आहे.