पंतप्रधान ग्राम सडक योजनेतील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी वीस कोटी मिळावेत !

सार्व. बांधकाम मंत्र्यांकडे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची मागणी
Edited by: देवयानी वरसकर
Published on: August 03, 2023 16:19 PM
views 139  views

सिंधुदुर्गनगरी : अनेक गावांना जोडणाऱ्या पंतप्रधान ग्राम सडक योजनेतील रस्ते डागडुजी अभावी नादुरुस्त झाले आहेत. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे या जिल्ह्यात सुमारे 200 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे तातडीने  दुरुस्ती व डागडुजी होणे आवश्यक आहे. यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये 100 किलोमीटर लांबीचे रस्ते प्राधान्य क्रमाने दुरुस्तीसाठी घ्यावेत व त्यासाठी वीस कोटी रुपयांचा निधी मिळावा अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी गुरुवारी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.

          पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे अनेक मार्ग सिंदूर जिल्हा परिषदेने अद्याप ताब्यात घेतलेले नाहीत. त्यामुळे गेले दहा वर्षे  कोणतीही दागडूजी झालेली नाही. या रस्त्यांचे  काम पूर्ण झाल्यानंतर पहिली पाच वर्षे संबंधित ठेकेदार या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची जबाबदारी असते. मात्र आता दहा वर्षे उलटून गेली असून संबंधित ठेकेदारांची दुरुस्तीची जबाबदारी गेल्या पाच वर्षांपूर्वीच संपलेली आहे. त्यामुळे गेले पाच वर्ष या रस्त्यांची दुरुस्ती झालेले नाही. त्यामुळे पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे  अनेक रस्ते नादुरुस्त झाले आहेत. या रस्त्यांची दुरुस्ती होणे आवश्यक आहे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे लेखी निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहेत.

      पंतप्रधान ग्रामसडक योजनेखाली जिल्ह्यात अनेक गावे जोडणाऱ्या या रस्त्यांची एकूण लांबी 413.22 किलोमीटरची असून यापैकी 200 किलोमीटर लांबीचे रस्ते, नादुरुस्त झाले आहेत. अनेक ठिकाणी या मार्गावर खड्डे पडले असून त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. ग्रामीण भाग जोडणाऱ्या व दळणवळणासाठी महत्वाच्या असणाऱ्या या मार्गांवर रहदारी करणाऱ्या नागरिकांना मोठी अडचण झाले आहे.  या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी प्रति किलोमीटर 18 लाख रुपये खर्च अपेक्षित असून पहिल्या  टप्प्यात  100 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दुरुस्ती व्हावी व या दुरुस्तीसाठी 18 ते 20 कोटी रुपये  मिळावेत अशी मागणी ही भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केली आहे.