RPD च्या २ विद्यार्थ्यांची इस्रो भेटीसाठी निवड

Edited by: विनायक गांवस
Published on: April 10, 2024 14:47 PM
views 291  views

सावंतवाडी : युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च STS - 2023-24 परीक्षेचे ७ वे वर्ष असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात २६ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती.सिंधुदुर्ग जिल्हातून १०,४६७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. या परीक्षेत RPD प्रशालेने घवघवीत यश संपादन केले आहे. इ. 06 वी मधून कु. कर्तव्य तेजस बांदिवडेकर याने सुवर्णपदकासह जिल्हयात दुसरा तर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. याचसोबत इ. 07 वी मधून कु. सोहम बापूशेट कोरगांवकर याने सुवर्णपदकासह जिल्हयात पाचवा तर तालुक्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. या गुणवत्तेसाठी कर्तव्य व सोहम दोघांनाही भारतीय अंतराळ संशोधन संस्था ( ISRO ) या संस्थेला विमानाने प्रवास करून भेट देण्याची संधी मिळणार आहे.

तर इ. 07 वी मधून कु. तन्वी प्रसाद दळवी हिने सुवर्णपदकासह जिल्हयात 23 वा तर तालुक्यात पाचवा क्रमांक पटकावला आहे. याचबरोबर साक्षी रविंद्र गुरव (०७ वी) व समिक्षा जयसिंग वाघमोडे (०७ वी) यांनी रौप्य पदक पटकाविले आहे. तसेच कु. प्रांजली प्रमोद सावंत (इ.०६ वी) , कु. अमेय आनंद आपटे (इ.०७ वी) , कु. मानस महेश कुडतरकर (इ.०७ वी) आणि कु. अस्मी प्रवीण मांजरेकर (इ.०७ वी) यांनी  कांस्य पदकाची कमाई केली आहे.

या कामगिरीबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, सर्व मार्गदर्शक शिक्षकवृंद, पालकवर्ग या सर्वांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष विकास सावंत, सचिव प्रा. व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर व सर्व संस्था सदस्य तसेच मुख्याध्यापक जे. व्ही. धोंड उपमुख्याध्यापक. पी. एम. सावंत , पर्यवेक्षक श्रीम .बी. आर.चौककर व उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक तसेच शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.