कलमठच्या काशिकलेश्वर मंदिरचा प्रथम वर्धापनदिन सोहळा ९ - १० फेब्रुवारीला..!

Edited by: उमेश बुचडे
Published on: February 09, 2024 08:39 AM
views 207  views

कणकवली : कलमठ श्री देव काशिकलेश्वर मंदिर प्रथम वर्धापन दिन सोहळा ९ व १०फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. या निमित्ताने ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वा लघुरुद्र आणि धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी पाच वाजता महिला मंडळाचे सुस्वर भजन, तसेच बिडेवाडी यांचे सुस्वर भजन, ७ व समर्थ कलेश्वर ग्रुप कलमठ प्रस्तुत स्वरसंध्या( अभंग भक्तीगीत भावगीतांचा कार्यक्रम) रात्री ८ वा  विनोदी नाटिका 'आले देवाजीच्या मना' गोरक्षनाथ मित्र मंडळ कलमठ गोसावी यांच्या वतीने सादर करण्यात येणार आहे. व रात्री ९.३० वा 'कालचक्र युगाचा महिमा' हा कार्यक्रम खालची कुंभारवाडी यांच्या वतीने साजरा करण्यात येणार आहे.

तसेच दुसऱ्या दिवशी 10 फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते १ पर्यंत धार्मिक विधी होम ,हवन करण्यात येणार असून दुपारी १ ते ३  महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. व सायंकाळी ५ नंतर महाजन नगर महिला मंडळाचे सुस्वर भजन होणार असून सायंकाळी ७ वाजता पखवाज वादन श्री हेमंत तवटे 51 पखवाज वादकांचा नाद तांडव होणार आहे.  रात्री ९ वाजता कलमठ महिला मंडळाच्या सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी त्या कार्यक्रमासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री काशिकलेश्वर मंदिर समिती कलमठच्या वतीने करण्यात येत आहे.