
वेंगुर्ला : शिरोडा केरवाडा येथील महाजबी अहमद मलिक (वय -१९) ही युवती २० नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता राहत्या घरातून नापता झाली आहे. याबाबत तिचे वडील अहमद मस्तकिम मलिक यांनी शिरोडा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, महाजाबी ही दि. २० नोव्हेंबर रोजी ९.३० वाजताच्या मानाने शिरोडा केरवाडा येथील राहत्या घरातून शिरोडा येथून औषधे घेऊन येते असे सांगून हातात प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये दवाखान्याचे कागद घेऊन घरातून निघून गेली ती अद्याप आली नाही. याबाबत त्यांनी आज २१ नोव्हेंबर रोजी शिरोडा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तरी सदर व्यक्ती कुठेही आढळून आल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश राऊळ करीत आहेत.