
कणकवली : कणकवली विभागाची 18 कोटी 13 लाख इतकी वीज थकबाकी असून कणकवली, देवगड ,मालवण ,आणि वैभववाडी या चार तालुका मिळवून कणकवली विभाग आहे.या विभागात 1 लाख 50 हजार ग्राहक आहेत. त्यापैकी 47 हजार 700 ग्राहकांकडून तब्बल 18 कोटी 13 लाख रुपये बाकी असल्याने ग्राहकांनी आपली थकबाकी वेळेत भरून महावितरनास सहकार्य करावे असे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी ग्राहकांना केले आहे.
18 कोटी 13 लाख मध्ये घरगुतीबिल 5 कोटी 14 लाख , व्यापारी वर्गाकडूनबिल 1 कोटी 80 लाख, औद्योगिक क्षेत्रातील बिले 1 कोटी 90 लाख , शेती बिल 2 कोटी 25 लाख , स्ट्रीट लाईट बिल थकबाकी 4 कोटी रुपये, पाणीपुरवठ्याची बिल 2 कोटी 65 लाख, आणि 40 लाख रुपये शासकीय कार्यालयाचे विज बिल असे एकूण कणकवली विभागाची 18 कोटी 13 लाख वीज थकबाकी येणे बाकी असल्याची माहिती कार्यकारी अभियंता मोहिते यांनी दिली.
गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर देखभाल आणि दुरुस्ती कामे देखील युद्धपातळीवर महावितरण कडून करण्यात येत आहेत. त्यामुळे ग्राहकांनी आपली वीजबिले वेळेत भरून सहकार्य करावे काही तक्रार असेल तर आपल्या नजीकच्या कार्यालयात संपर्क साधावा जेणेकरून आपली वीज खंडित होणार नाही याची काळजी घ्यावी.
तसेच ग्राहकांनी ऑनलाइन बिल भरणा केली तर 0.25 % पॉईंट टक्के व जास्तीत जास्त 500 रुपये ची बचत होऊ शकते आणि आपल्याला कुठेही न जाता आपल्या मोबाईलवरच आपले बिल भरता येते. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी आपले थकीत असलेले वीज बिल भरून आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी केले आहे