
कुडाळ : वायंगणीवाडी, घावनाळे येथील १७ वर्षीय दिशा तिमाजी वागळे ही २ ऑगस्ट २०२५ पासून बेपत्ता झाली असून तिच्या कुटुंबीयांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनंतर पोलिसांकडून तिचा शोध तीव्र करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिशा ही ५ फूट उंच, गहूवर्णीय, लांबसडक केस व सडपातळ बांधा असलेली आहे. गोल चेहरा, सरळ नाक व काळसर डोळे हे तिचे वैशिष्ट्य आहे. बेपत्ता होताना तिने पिवळ्या रंगाची साडी, गडद निळा ब्लाऊज, गडद निळी ओढणी व पायात काळ्या रंगाचे सँडल घातले होते. तिच्या कानात सोन्याची रिंग व गळ्यात सोन्याची चेन आहे.
या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दिशेबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास त्यांनी तातडीने कुडाळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल.
संपर्क क्रमांक :
पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम : ७३८७६८७८८८
पोलीस उपनिरीक्षक अनिरुद्ध सावर्डे : ८८८८०२९९९१
पोलीस हवालदार प्रमोद काळसेकर : ८६०५७२४१०५
कुडाळ पोलीस ठाणे : ०२३६२–२२२५३३










