श्री देव पिंपळेश्वराचा १७ वा वर्धापन उद्या..!

Edited by:
Published on: April 10, 2024 15:00 PM
views 43  views

दोडामार्ग : बाजारपेठेतील श्री देव पिंपळेश्वराचा १७ वा वर्धापन दिन गुरुवार दिनांक ११ एप्रिल रोजी साजरा होणार आहे. या निमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, सकाळी ११ वाजता आरती, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सांयकाळी ४ वाजता भजन, रात्रौ ९ वाजता कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, नेरुर यांचा नाट्य प्रयोग सादर होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी सहभागी होवून या कार्यक्रमांची शोभा वाढवावी असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.