121 शाळा शिक्षकांअभावी बंद पडण्याच्या मार्गावर ; विनायक राऊत, वैभव नाईक घेणार आहेत CEO ची भेट

Edited by: भरत केसरकर
Published on: June 09, 2023 20:33 PM
views 94  views

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२१ शाळांच्या शिक्षक प्रश्नाबाबत खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक हे सोमवार दि. १२ जून  रोजी सकाळी  ११:३० वा. ओरोस येथे जिल्हापरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांची भेट घेणार आहेत. तब्बल १२१ शाळांच्या शिक्षक प्रश्नाबाबत खा. विनायक राऊत, आ.वैभव नाईक सोमवारी घेणार जि.प. मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. यासाठी शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी  आवाहन केलंय.  

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२१ शाळांच्या शिक्षक प्रश्नाबाबत खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक हे सोमवार दि. १२ जून  रोजी सकाळी  ११:३० वा. ओरोस येथे जिल्हापरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांची भेट घेणार आहेत. तब्बल १२१  शाळांमध्ये एकही शिक्षक उपलब्ध केलेले नसल्याने  जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षक उपलब्ध न झाल्यास सदर  शाळा काही काळाने बंद होणार असून यावर आवाज उठविणे गरजेचे आहे. तरी जिल्ह्यातील पालक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी याप्रसंगी उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सतीश सावंत व जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी केले आहे.

एकही शिक्षक उपलब्ध केलेले नसल्याने  जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षक उपलब्ध न झाल्यास सदर  शाळा काही काळाने बंद होणार असून यावर आवाज उठविणे गरजेचे आहे. तरी जिल्ह्यातील पालक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी याप्रसंगी उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सतीश सावंत व जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी केले आहे.