
कुडाळ : 12 वीचा निकाल जाहीर झालाय. कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज कुडाळने घवघवीत यश संपादन केलंय. कॉलेजचा 12 वीचा निकाल 99.09 टक्के लागलाय.
कॉमर्स शाखेची विधी शेट्टी 94.50 टक्के गुण मिळवत कॉलेजमधून प्रथम येण्याचा मान मिळवलाय. कॉमर्स शाखेचा यशवंत सामंत 92.83 टक्के गुण मिळवत दुसरा आलाय. कॉमर्स शाखेचा स्वराज ओटवणेकर 90.33 टक्के गुण मिळवत तिसरा आलाय. तर विज्ञान शाखेचा 100 टक्के, Voc: 100 टक्के, कॉमर्स शाखेचा 99.47 टक्के, कला शाखेचा 97.03 टक्के लागलाय. कॉलेजसह विद्यार्थ्यांच्या या यशासाठी अभिनंदन करण्यात आलाय.