राजा शिवाजी विद्यालयाच्या वर्ग खोली बांधण्यासाठी खासदार निधीतून 12 लाख

रुपेश राऊळ यांच्या हस्ते भूमिपूजन
Edited by: विनायक गांवस
Published on: January 11, 2024 07:12 AM
views 55  views

सावंतवाडी : विलवडे येथील राजा शिवाजी विद्यालय वर्ग खोली बांधणेसाठी खासदार विनायक राऊत यांच्या खासदार स्थनिक विकास निधीतून १२ लाख रूपयांचा निधी देण्यात आला आहे. या कामाचे भूमिपूजन उबाठा शिवसेनेचे तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांच्या हस्ते पार पडले. 

यावेळी उपाजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार,तालुका संघटक मायकल डिसोझा, औद्योगिक औद्योगिक विकास संस्थेचे चेअरमन संदीप माळकर, पक्ष निरीक्षक अशोक परब, उपविभाग प्रमुख मंथन गवस विलवडे सरपंच प्रकाश दळवी कृष्णा सावंत, माजी उपसभापती विनायक दळवी, सोनू दळवी, कृष्णा सावंत, भालावल माजी सरपंच, दिलीप परब, प्रशालेतील सर्व सर्व शिक्षक आणि विद्यार्थी वर्ग व पंचक्रोशीतील बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विलवडे सरपंच प्रकाश दळवी यांनी खासदार विनायक राऊत यांचे आभार मानले‌‌. विकासासाठी सहकार्यांची अपेक्षा व्यक्त केली. तसेच उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार यांनी कामांसाठी कधी भेदभाव केलेले नाही नेहमी प्राधान्य देत सर्वसामान्यांचे  कटीबद्ध आहोत असं म्हणाले.

यावेळी  तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी खासदार विनायक राऊत शैक्षणिक संस्था बळकट होवून विद्यार्थना शैक्षणिक सेवा सुविधा मिळाव्यात म्हणून कटिबद्ध आहेत असे सांगितले. ते म्हणाले,पंचक्रोशीतील केंद्रबिंदू असलेले हायस्कूल नावाप्रमाणे नाव रुपाला आले पाहिजे. यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करत रहावे. हायस्कूल तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यातही नाव रुपास आलं पाहिजे, त्यासाठी लागेल ते सहकार्य पक्षाच्यावतीने खासदार विनायक राऊत, पक्षाच्या वतीने केलं जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.