दोडामार्गात 12 ग्रामपंचायती भाजपाच्या | जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी वाचली यादी | सरपंचांना थेट मीडियासमोर केल प्रेजेंट !

अजूनही काही ग्रामविकास पॅनलचे सरपंच आमच्या संपर्कात : तेली
Edited by: संदीप देसाई
Published on: December 21, 2022 19:57 PM
views 269  views

दोडामार्ग : दोडामार्ग १२ ग्रापंचायतीवर भारतीय जनता पार्टीचे सरपंच बसले आहेत. त्यामुळे दोडामार्ग तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांत जनतेने मोठे यश दिल्याचे सांगत थेट त्या सरपंचांना मीडिया समोर प्रेजेंट करत विरोधकांना  भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी चोख उत्तर दिल आहे. एवढेच नव्हे तर अजूनही काही ग्रामविकास पॅनलचे सरपंच आमच्या संपर्कात असून ते विकासाच्या प्रवाहात म्हणजेच भाजप मध्ये सहभागी होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. तर दोडामार्ग मधील जनतेने जे भाजप व शिंदे गटाला उस्फूर्त मतदान करत या सरकार वर जो विश्वास व्यक्त केला आहे त्याची उतराई म्हणून दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथील रोजगार देणारा एमआयडिसी प्रकल्प व तिलारी येथील पर्यटन प्रकल्प मार्गी लावणारच असा शब्द दोडामार्गच्या जनतेला दिला आहे. 

  मंगळवारी जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकाला नंतर भाजपला नेमक किती यश मिळाले आणि किती गावांवर भाजपचे सरपंच विराजमान झालेत याची माहिती देण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दोडामार्ग मणेरी येथील हॉटेल शेलोट मध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेपूर्वी राजन तेली व दोडामार्ग तालुका भाजपने तालुक्यात भाजपच्या निवडून आलेल्या सरपंच यांना मार्गदर्शन करून मीडिया समोर हे आहेत भाजपचे सरपंच असे सांगत प्रेजेंट केले. त्यामुळे विरोधक करत असलेल्या वल्गनाना भाजपने हटके असे प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष तेली यांचे समवेत जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, राजन म्हपसेकर, माजी जिल्हा बँक संचालक प्रकाश गवस, तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, चंद्र्कांत मळीक, दादू कविटकर आदि उपस्थित होते. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना आमदार राजन तेली यांनी दोडामार्गात भाजपच्या सरपंच व ग्रामपंचायत यांची यादी वाचली ती पुढीलप्रमाणे यात फुकेरी पूर्ण पॅनल, आडाळी - पराग गावकर, कळणे- अजित मनोहर गवस, परमे- पणतुर्ली - प्रथमेश गजानन देऊलकर, मोरगाव - संतोष वसंत आहिर, कळणे-अजित मनोहर देसाई,  तळकट - सुरेंद्र संभाजी सावंत-भोसले, बोडदे- खानयाळे - हरिश्चंद्र गंगाराम नाईक, उसप- रुचिता प्रवीण गवस, वझरे गिरोडे - सुरेश सदाशिव गवस, खोक्रल- देवेंद्र रामकृष्ण शेटकर, तळेखोल – वंदना सावंत, माटणे- महादेव दत्ताराम गवस हे सरपंच आपले असल्याच जाहीर केल आहे. यात देवेंद्र शेटकर, महादेव गवस वगळता अन्य सरपंच येथे प्रत्यक्ष उपस्थित होते.