
सिंधुदुर्गनगरी : पी. एम. किसान योजने अंतर्गत ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करत असताना मौजे डिगज ता. कुडाळ येथे 108 बांगलादेशी नागरिकांनी पी. एम. किसान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल केल्याचे निदर्शनास आल्यामुळे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिलेल्या निर्देशानुसार या प्रकरणाची चौकशी, तपासणी करण्यासाठी पुढीलप्रमाणे समिती गठित करण्यात आली आहे.
अध्यक्ष उपविभागीय अधिकारी कुडाळ, सदस्य उपविभागीय पोलीस अधिकारी, सावंतवाडी, सदस्य जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, सिंधुदुर्ग, सदस्य तहसिलदार कुडाळ जि. सिंधुदुर्ग, सदस्य गटविकास अधिकारी, कुडाळ जि. सिंधुदुर्ग, सदस्य सचिव तालुका कृषी अधिकारी, कुडाळ जि.सिंधुदुर्ग. तसेच सदर समितीस दोन दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हास्तरावरुन देण्यात आलेल्या आहेत.