
मंडणगड : पावसाळ्यातील दरड कोसळण्याची संभाव्य आपत्ती लक्षात घेऊन मंडणगड तालुक्यातील 15 गावातील दरड प्रवण क्षेत्रातील 271 घरातील 1046 ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी स्थलांतराचे आदेश महसुल विभागाचे देण्यात आले आहेत. यात बाणकोट मोमीनवाडी येथील 20 घरे, नारायणनगर हनुमान पारवाडी तळेवाडी 67 घरे, वेसवी 8 घरे, वाल्मिकीनगर 39 घरे, कोंडगाव 7 घरे, बहिरवली सोनारवाडी 14 घरे, गोवेले 15 घरे, चिंचघऱ 7 घरे, चिंचाळी 21 घरे, लोकरवण 24 घरे, कुडुकखुर्द हनुमानवाडी 14 घरे, साखरी 6 घरे, मंडणगड धनगरवाडी 8 घरे, दाभट बौध्दवाडी 18 घरे, शेनाळे 3 घरे अशा 271 घरांना स्थलातरांचे आदेश देण्यात आले आहेत आपत्तकालीन परिस्थितीकरात पर्यायी व्यवस्था म्हणुन संबंधीतांची जिल्हा परिषद शाळांमध्ये निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.