
वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यात शुक्रवारी २ डिसेंबर रोजी पर्यंत ग्रामपंचायत निवडणूक थेट सरपंचपद व सदस्यपद निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीपर्यंत एकूण ५८८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तालुक्यातील एकूण २३ ग्रामपंचायतीच्या निवडणूका १८ डिसेंबर रोजी होणार असून यामध्ये २३ थेट सरपंच पदासाठी १०४ उमेदवारी अर्ज व सदस्य पदासाठी ४८४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
थेट सरपंच पदासाठी रेडी ग्रामपंचायत १०, उभादांडा ६, शिरोडा ९, आडेली ३, अणसुर ६, आसोली ३, भोगवे ३, चिपी २, दाभोली ५, होडावडा ३, केळुस ४, कोचरा ५, कुशेवाडा ४, मठ ३, मेढा ८, म्हापण ३, पाल ३, पालकरवाडी ७, परबवाडा ३, परुळेबाजार ४, तुळस ४, वजराट ४ व वेतोरे २ इत्यादी अर्ज दाखल झाले आहेत.
तसेच ग्रामपंचायत सदस्य पदासाठी रेडी ४१, उभादांडा ४२, अणसुर १०, आसोली १४,
भोगवे २२, चिपी १३, दाभोली २१, होडावडा २६, केळुस ११,
कोचरा १३, कुशेवाडा २६,
आडेली २३, वजराट १८, मठ १९, मेढा ११, म्हापण २८, पाल ११, पालकरवाडी २१, परबवाडा १८, परुळेबाजार २२, शिरोडा ३३, तुळस २७, वेतोरे १४ इत्यादी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.