सिंधुदुर्गातील 103 जोखीमग्रस्त गावे

Edited by: देवयानी वरसकर
Published on: July 14, 2023 11:15 AM
views 168  views

सिंधुदुर्गनगरी :  पावसाळा व साथीचे आजार या पार्श्वभूमीवर  सिंधुदुर्ग जिल्ह्यात 103 गावे जोखीमग्रस्त गावे म्हणून  जिल्हा परिषदेने  निश्चित केली आहेत. भात शेतीच्या हंगामात  लेप्टोपायरोसिस चा प्रादुर्भाव होऊ नये या दृष्टीने आरोग्य विभाग सर्तक आहे. जोखीम ग्रस्त गावामध्ये डायक्लो सायकलिंग गोळ्याचे वाटप सुरू असून जनतेने उकळून पाणी प्यावे तसेच तशी लक्षणे आढळल्यास नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय , प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे या कालावधीसाठी गोवा जीएमसी येथे ही मदत कक्ष सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा साथ रोग नियंत्रण अधिकारी संदेश कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

    सिंधुदुर्ग नगरी जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात   लेप्टो पायरोसिस साथ रोग ,लोकसंख्या दिन, कुटुंब नियोजन या  बाबत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी साथ रोग अधिकारी संदेश कांबळे हे बोलत होते यावेळी जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी सई धुरी ,जिल्हा क्षयरोग अधिकारी हर्षल जाधव उपस्थित होते.

     यावेळी बोलताना कांबळे म्हणाले पावसाळा सुरू झाला असून गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे लेप्टो चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून आला नाही परंतु यावर्षी लेप्टोच्या दृष्टीने सिंधुदुर्ग आरोग्य विभाग अलर्ट मोड वर असून प्रत्येक उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर आणि जोखीमग्रस्त गाव वाड्यामध्ये डायक्लोसायक्लिन त्या गोळ्या वाटप केल्या आहेत १ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत डायक्रोसायक्लिन गोळ्या देण्यात येणार आहेत 

जोखीम ग्रस्त आणि आपत्ती चक्रीवादळ प्रणव क्षेत्रात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना योग्य ती खबरदारी घ्यावी जेणेकरून साथ उद्भवणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आले असून जोखीमग्रस्त गावांमध्ये  कुडाळ तालुका२४ मालवण ८, कणकवली तालुक्यात ३८, देवगड तालुक्यात ६, वैभववाडी तालुक्यातील २, वेंगुर्ले तालुक्यात २, सावंतवाडी तालुक्यात १६ दोडामार्ग तालुक्यात १७ आदी जोखीमग्रस्त गावांमध्ये योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच आपत्ती पूर्व प्रणव क्षेत्रांमध्येही पुराचे पाणी साचून साथ रोगाचा फायदा होऊ नये या दृष्टीने संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून आपत्ती चक्रीवादळ प्रणव क्षेत्रामध्येही योग्य ती खबरदारी घ्यावी याबाबत सूचना दिल्याचे सात रोग आरोग्य अधिकारी संदेश कांबळे यांनी सांगितले