सरपंच पदासाठी १०३ तर सदस्य पदासाठी ३९७ नामनिर्देशन पत्र दाखल आजअखेर एकूण सरपंचसाठी १४२ तर सदस्यसाठी ५०० नामनिर्देशन पत्र दाखल

आखाडा ग्रामपंचायत निवडणूकीचा
Edited by: प्रतिनिधी
Published on: November 30, 2022 21:20 PM
views 277  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील ३२५ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी आजच्या दिवशी  सरपंच पदासाठी १०३ तर सदस्य पदासाठी ३९७ नामनिर्देशन पत्र  दाखल झाली. आज अखेर एकूण सरपंचपदासाठी १४२ तर सदस्यपदासाठी ५०० नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याची माहिती  जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य शाखेकडून देण्यात आली.

तालुका निहाय  दाखल झालेले नामनिर्देशन पत्र आणि एकूण दाखल झालेले  नामनिर्देशन पत्र पुढीलप्रमाणे: कणकवली- ग्रामपंचायत संख्या ५८, सरपंच पदासाठी २१, सदस्य पदासाठी १०७,आज अखेर एकूण सरपंचपदासाठी ३१,सदस्य पदासाठी १२९. वैभववाडी - ग्रामपंचायत संख्या १७, सरपंच पदासाठी ४, सदस्य पदासाठी १४,आज अखेर एकूण सरपंचपदासाठी ५, सदस्य पदासाठी १६. देवगड - ग्रामपंचायत संख्या ३८, सरपंच पदासाठी १३, सदस्य पदासाठी ४०, आज अखेर एकूण सरपंचपदासाठी १९, सदस्य पदासाठी ६१. 

मालवण - ग्रामपंचायत संख्या ५५, सरपंच पदासाठी ३, सदस्य पदासाठी १४,आज अखेर एकूण सरपंचपदासाठी ६, सदस्य पदासाठी २१. कुडाळ - ग्रामपंचायत संख्या ५४, सरपंच पदासाठी २७, सदस्य पदासाठी ८०, आज अखेर एकूण सरपंचपदासाठी ३२, सदस्य पदासाठी ९१. सावंतवाडी- ग्रामपंचायत संख्या ५२,  सरपंचपदासाठी १६, सदस्य पदासाठी ७०,आज अखेर  सरपंचपदासाठी एकूण १६, सदस्य पदासाठी ७१ . वेंगुर्ला- ग्रामपंचायत संख्या २३, सरपंच पदासाठी ९, सदस्य पदासाठी ३६, आज अखेर एकूण सरपंचपदासाठी १५, सदस्य पदासाठी ५७. दोडामार्ग - ग्रामपंचायत संख्या २८, सरपंच पदासाठी १०, सदस्य पदासाठी ३६, आज अखेर एकूण सरपंचपदासाठी १८, सदस्य पदासाठी ५४.