
कुडाळ : तळकोकणात पहिल्यांदाच महागणेश याग होतोय. श्री श्री 108 महंत मठाधीश परमपूज्य सद्गुरू श्री गावडेकाका महाराज यांच्या संकल्पनेतून शनिवार दि. 28 जानेवारी 2023 ला श्री स्वामी समर्थ मठ, माड्याचीवाडी येथे 1008 श्रीफळ गणेश याग्य हा सोहळ्याचे आयोजन करण्यात आलंय. याला भक्तगणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय.
भाविकांच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी, त्यांना चांगले आरोग्य, दीर्घायुष्य लाभावे,. सुख, समृद्धी, समाधान प्राप्त व्हावे यासाठी या कार्यक्रमाचं खास आयोजन करण्यात आलंय. यानिमित्ताने सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. सकाळी 9.00 ते दुपारी 01.00 प्रमुख यागविधी, दुपारी 02.00 पासून अखंड जपनाम सेवा, दुपारी 01.00 वा. दर्शन, दुपारी 01.30 वा. महाप्रसाद असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन श्री सद्गुरु भक्त सेवा न्यास माड्याचीवाडी यांच्यावतीने करण्यात आलंय.