माधवराव पवार विद्यालयाचा 100 टक्के निकाल ; विद्यालयाची अस्मिता काळे तालुक्यात प्रथम

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: June 02, 2023 18:39 PM
views 96  views

वैभववाडी :  वैभववाडी: तालुक्यातील माधवराव पवार विद्यालय कोकीसरे, विद्यालयाचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला आहे. परीक्षेला बसलेले 76 पैकी 76 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

विद्यालयात प्रथम क्रमांक अस्मिता अजितसिंह काळे (479) 95.80% तर द्वितीय क्रमांक योगिता प्रकाश काळे (475) 95.00% तर तृतीय क्रमांक संपदा यशवंत पुजारी(467) 93.40% .यांनी मिळविला.सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळा प्रशासनाने अभिनंदन केले.