
कुडाळ : मुख्यमंत्री मदतनीस कक्ष कुडाळ तालुका अध्यक्ष तथा शिवसेना उपतालुकाप्रमुख अरविंद करलकर तसेच शिवसेना नेते किरण भैया सामंत यांच्या पाठपुराव्याने कुडाळ येथील राहिवासी गणेश शेटकर यांना दुर्धर आजारावर मात करण्यासाठी एक लाख रुपयाची मुख्यमंत्र्यांच्या निधीतून आर्थिक सहाय्य करण्यात आले आहे.
कुडाळ येथील रहिवासी असलेले गणेश शेटकर हे दुर्धर आजाराने त्रस्त होत. कुडाळ येथे त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता त्यांच्या डोक्यातील कानामागील नस दबली असल्याचे समोर आले तर त्यांच्यावर तात्काळ कोल्हापूर येथे उपचार करणे गरजेचे होते मात्र त्यांची आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्याने त्यांनी शिवसेना मुख्यमंत्री मदत कक्ष तालुकाध्यक्ष अरविंद करलकर यांच्याशी संपर्क साधत मुख्यमंत्री सहायता निधीतून मदतीची मागणी केली होती. त्यानंतर शिवसेना नेते किरण सामंत व अरविंद करलकर यांनी पाठपुरावा केला असता. गणेश शेटकर यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत करण्यात आली. कोल्हापूर येथील वेस्टन इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसान्सेस येथे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. गणेश शेटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते किरण भैया सामंत, व मुख्यमंत्री मदत निस कक्ष तालुकाध्यक्ष अरविंद करलकर यांचे आभार मानले आहेत.
तर मुख्यमंत्री मदतनीस कक्ष तालुकाध्यक्ष अरविंद करलकर यांनी दुर्धर व गंभीर व महागड्या शस्त्रक्रिया करावयाच्या असल्यास गोरगरीब नागरिकांना भरीव प्रमाणात आर्थिक सहाय्य हवे असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.