मेढे तीर्थक्षेत्र श्री देव नागनाथ मंदिरसाठी १ कोटींचा निधी...!

मंत्री दीपक केसरकर यांची ग्वाही
Edited by:
Published on: March 10, 2024 13:50 PM
views 262  views

दोडामार्ग : मेढे येथील पांडवकालीन प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री देव नागनाथ मंदिर सभामंडप व परिसर सुशोभीकरणसाठी १ कोटी रुपयांचा निधी येत्या मे महिन्यांपर्यंत देण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी दिली आहे. त्यांनी दोडामार्ग दोऱ्यावर असताना रविवारी श्री देव नागनाथ मंदिरला भेट देत देव नागनाथ चे दर्शन घेतले. यावेळी  तेथील स्थानिक देवस्थान समितीचे पदाधिकारी यांनी त्यांचं स्वागत केलं. व मंदिर उभारणी बाबत मंत्री केसरकर यांचं लक्ष वेधले. हे मंदिर क वर्ग तीर्थयात्रा पर्यटन स्थळा मध्ये समावेश असल्याकडे लक्ष वेधण्यात आले. यावेळी त्यांनी ही ग्वाही मेढे येथील ग्रामस्थांना दिली. 

मंत्री केसरकर यांचा आज तिलारी खोऱ्यात दौरा होता. दौरादरम्यान  ते मेढे येथे आले होते. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेनेचे जिल्हा संघटक रुपेश पावसकर, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, उपजिल्हा प्रमुख राजेंद्र निंबाळकर, जिल्हा संघटक प्रेमानंद देसाई, महिला तालुका प्रमुख चेतना गडेकर, विभाग प्रमुख रामदास मेस्त्री, तिलकांचन गवस, उपतालुका प्रमुख दादा देसाई, संदीप गवस, सूर्यकांत गवस, मायकल लोबो, स्वप्नील निंबाळकर, यांसह मेढे स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष देऊ गवस, सचिव मनोहर गवस, सुनील गवस, यांसह केसरकर, जयवंत देसाई आदी उपस्थित होते.