
वेंगुर्ला : राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या समग्र शिक्षा योजनेअंतर्गत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी वेंगुर्ला तालुक्यातील प्राथमिक शाळेच्या नवीन वर्ग खोल्या/अतिरिक्त नवीन वर्ग खोल्या/ बांधकाम व प्राथमिक शाळांच्या वर्ग खोल्या दुरुस्तीसाठी सुमारे १ कोटी ६८ लाख ७७ हजार एवढा निधी मंजूर केला असल्याची माहिती जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर यांनी दिली आहे.
नवीन वर्गखोल्या बांधणे तालुक्यातील ३ शाळांना ६० लाखांचा निधी देण्यात आला आहे. यात उभादांड नं १ शाळेसाठी १५ लाख, दाभोली नं २ शाळेसाठी ३० लाख, मातोंड मिरिस्तेवाडी शाळेसाठी १५ लाख एवढा निधी देण्यात आलेला आहे. तसेच वेंगुर्ले तालुक्यातील सुमारे २१ प्राथमिक शाळेच्या इमारत, छप्पर दुरुस्तीसाठी १ कोटी ८ लाख ७७ हजार एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे.
यात शारदा विद्या मंदिर आडेली भंडारवाडा शाळेसाठी ६ लाख, जय हिंद विद्यालय तुळस फासतळी शाळेसाठी ४ लाख, श्री शारदा विद्या मंदिर तुळस शाळेसाठी ६ लाख, पाल खाजणादेवी शाळेसाठी ६ लाख, मातोंड सातवायंगणी शाळेसाठी १.५० लाख, तुळस जैतीर शाळेसाठी ३ लाख, वजराट देवसु शाळेसाठी ५ लाख, मोचेमाड शाळेसाठी ३ लाख, कोचरे मायने शाळेसाठी ६ लाख, परुळे नं ३ शाळेसाठी ६ लाख, परुळे गवाण शाळेसाठी ६ लाख, तुळस गिरोबा शाळेसाठी ५ लाख, तुळस फातरवाडा शाळेसाठी ३०.२५ लाख, वजराट क्र. १ शाळेसाठी ६ लाख, सातवायंगणी क्र. १ शाळेसाठी ५ लाख, रेडी सुकळभाट क्र.२ शाळेसाठी ६ लाख, वायंगणी सुरंगपाणी शाळेसाठी ३ लाख, रेडी क्र.१ शाळेसाठी ९ लाख, वेतोरे नमसवाडी शाळेसाठी ५ लाख, पेंडूर पेंडऱ्याचीवाडी शाळेसाठी ६ लाख, वेतोरे क्र. १ शाळेसाठी ६ लाख असे एकूण १ कोटी ८ लाख ७७ हजार रुपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती सचिन वालावलकर यांनी दिली आहे.