
सावंतवाडी : सावंतवाडी व कुडाळ येथील सुप्रसिद्ध एस.एम. मडकईकर ज्वेलर्सचे मालक विराग मडकईकर व सौ. वैष्णवी मडकईकर यांनी सावंतवाडी व बांदा कट्टा कॉर्नर येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या दुर्गा मातेला एक ग्राम सोन्याचा हार अर्पण केला. सावंतवाडी रासाई मंडळ, कोलगावसह बांदा या ठिकाणी त्यांनी नवदुर्गेला हार अर्पण केले.
बांदा येथे हार अर्पण करताना बांदा कट्टा कॉर्नर मंडळाचे अध्यक्ष संजय नाईक, ज्येष्ठ व्यापारी भाऊ वळंजू, आपा चिंदरकर, साईप्रसाद काणेकर, अनंत आईर, माजी सरपंच बाळा आकेरकर आदी उपस्थित होते. यावेळी सौ. वैष्णवी मडकईकर यांचा सौ. रुपाली शिरसाट यांनी देवीची साडी देऊन सन्मान केला. मडकईकर यांनी दाखवलेल्या दातृत्वाबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.