
वेंगुर्ले- स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला शहरात ‘हर घर तिरंगा‘ हे अभियान राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून वेंगुर्ला नगरपरिषद आणि शिवाजी प्रागतिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने १२ ऑगस्ट रोजी कॅम्प परिसरात तिरंगा यात्रा काढण्यात आली.
या यात्रेत विद्यार्थ्यांनी तिरंगा घेत तसेच स्वातंत्र्यसैनिकांच्या आणि ऐतिहासिक व्यक्तींच्या वेशभूषा साकारत देशभक्तीचा संदेश दिला. यावेळी नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच शिवाजी प्रागतिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.