
मंडणगड ( दि. 17):- जमिनीच्या शोधात मंडणगड तालुक्यातील देव्हारे येथे आलेले नृत्य दिग्दर्शक व सिने कलाकार डँनियल डीसोजा यांची गेल्या चार वर्षापासून तालुक्याशी नाळ जोडली गेली आहे येथील माणसे येथील संस्कृती व प्रथा पंरपरा व प्रामुख्याने येथील पर्यावरण डीसोजा यांच्या कुटुंबास इतके आवडली की ते तालुक्याशी एकरुप झाले आहेत. येथील सर्व सार्वजनीक सणांना डीसुजा यांची उपस्थिती लाभते तालुक्यातील गोकुळगाव येथे दरवर्षी दहीहांडी आयोजन करतात व त्यांच्या दहीहांडीचे कार्यक्रमास पंचक्रोशीतील गोविंदा उपस्थित दाखवितात. आयोजन पुर्ण डीसुजा कुटुंब सहभागी होत इतकेच नव्हे तर गोविंदा गोपाळच्या जयघोषात गोविंदाबरोबर आनंदान नाचत सहभागी होतात. येथील माणसांनी त्यांना भरभरून आपुलकी व प्रेम दिले आहे व डीसुजा कुटुंबीय सुध्दा मंडणगडवर तितेकच प्रेम करतात मंडणगडला दोन तीन महिन्यातून एकदा भेट देत असतात देव्हारे येथील मुले सांभाळ करीत नसलेल्या वृध्दांसाठी निवारा उभारण्याचे कामात ते सध्या व्यस्त आहेत मंडणगड तालुक्यातील शेवरे येथे त्यांनी या करिता एक एकर जागा खरेदी केली आहे व त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून ते पुढील काम करीत आहेत येथे शेतीतील विविध प्रयोग करण्याचा मानस आहे. एका अनाथ मुलापासून जीवनाचा संघर्ष सुरु केलेल्या डीसुजा यांनी लौकीक जीवनात संघर्ष करुन नृत्य अभियानासह जीवनातील विविध क्षेत्रे स्व कतृत्वाने पादांक्रांत केली आहेत. सिमेंटच्या जंगालास कंटाळलेले मानवी मन निसर्गाच्या सानिध्यात मनःशांती शोधण्याचा प्रयत्न करीत आहे व तालुक्यातील तरुण मुंबई पुणे सारख्या महानगरात जाऊन जगण्यासाठी किड्या मुंगीप्रमाणे संघर्ष करीत आहे ही बाब मनाला खुपच दुःख देणारी आहे. इथेच काही करता का येत नाही हा प्रश्न त्यांना नेहमीच सतावत असतो व या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासठी डिसूजा यांनी स्थानीक पातळीवर रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा, गावातील बंद पडत चाललेली तालुक्यातील घरे पुन्हा सुरु व्हावीत, केवळ गणपती शिमगा व मे महिन्याच्या सुट्टीला गावी यायचे ही मानसीकता कमी करुन गावातच काही करता येईल का यासाठी पर्यटन शेती या विषयामध्ये इतरांना मार्गदर्शक ठरतील असे प्रयोग डिसूजा यांनी सुरु केले असून काही वर्षांनी पुर्णवेळ मंडणगडमध्ये राहून सामाजीक कार्य करण्याचे नियोजन असल्याचे सांगीतले.