

कोलगावातील जागृत देवस्थान म्हणजे श्री देव कलेश्वर
कोलगाव, कुणकेरी आंबेगाव या गावातील लोकांची देवावर श्रद्धा
जत्रेचे वैशिट्य म्हणजे या जत्रेत लावले जाणारे दारुसामान
सावंतवाडी : ऐतिहासिक वारसा लाभलेलं सावंतवाडी शहर. या शहरालगत वसलेलं कोलगाव गाव. या गावातील जागृत देवस्थान म्हणजे श्री देव कलेश्वर. हाकेला धावणारा, नवसाला पावणारा देव अशी या देवाची ख्याती. संपूर्ण जिल्ह्याभरात श्री देव कलेश्वराला मानणारा, त्याची मनोभावे पूजा करणारा भाविक वर्ग आहे. श्री देव कलेश्वराच आकर्षक अस भव्य मंदिर, त्याची रचना डोळ्याच पारणं फेडते. जागृत देवस्थान श्री देव कलेश्वराचा वार्षिक उत्सव त्याचे भाविक मोठ्या उत्साहात साजरा करतात. कोलगाव, कुणकेरी आंबेगाव या गावातील लोकांची देवावर श्रद्धा आहे.
जत्रोत्सवादिवशी कलेश्वर देवाची पालखी तरंग-काठी, देवघराकडून वाजत गाजत मंदिरापर्यंत आणली जाते. मंदिराला पाच प्रदक्षिणा घालून पालखी मंदिरामध्ये भक्तिभावाने ठेवली जाते. या जत्रेचे वैशिट्य म्हणजे या जत्रेत लावले जाणारे दारुसामान. हे दारू सामान देवाची सेवा म्हणून दिल जात. या जत्रोस्तवासाठी जिल्ह्याभरातुन हजारो भाविक दर्शनासाठी येतात. माहेरवाशीणी सुद्धा जत्रोत्सवा दिवशी देवाचे आशिर्वाद घेण्यासाठी गावी येतात. गोव्यातून देखील भाविक देवाचे आशिर्वाद घेण्यासाठी येतात. दसरा, सप्ताह, 101 सत्यनारायण महापूजा असे विविध धार्मिक कार्यक्रम मंदीरात संपन्न होतात.
यावर्षी मोठ्या प्रमाणात भाविक या यात्रेसाठी दाखल झाले आहेत. मोठ्या उत्साहात हा जत्रोत्सव सुरू आहे.