
सावंतवाडी: मुंबई विद्यापीठाच्या ५८ व्या युवा महोत्सवात यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या चार विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले. कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात पार पडलेल्या विभागीय फेरीत कॉलेजच्या एकूण वीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. संगीत, नृत्य, नाट्य, ललित कला आणि साहित्य अशा विविध प्रकारात ही स्पर्धा संपन्न झाली.
यामध्ये द्वितीय वर्ष कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या वेदांती संदीप वालावलकर हिने भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकारात द्वितीय क्रमांक तर त्याच वर्गातील निधी श्रीकांत जोशी हिने नाट्यसंगीत या प्रकारात तृतीय क्रमांक मिळवला. शास्त्रीय वादन - तालवाद्य प्रकारात द्वितीय वर्ष इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या सुरेंद्र तात्या साईल याने आणि मेहंदी डिझाईन प्रकारात द्वितीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या जुवेरिया कुतुबुद्दीन मुल्ला यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले. सप्टेंबर महिन्यात मुंबई येथे होणाऱ्या विद्यापीठस्तरीय फेरीत हे सर्व विद्यार्थी सहभागी होतील. त्यांना कॉलेजचे सांस्कृतिक समन्वयक प्रा.बॉनी शेरॉव यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले आणि प्राचार्य डॉ.रमण बाणे यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.