सिंधुदुर्गातील विद्यार्थी वैज्ञानिक व्हावेत हाच दिवंगत डॉ. रमेश सावंत यांचा मानस : श्रीकांत सावंत

Edited by: उमेश बुचडे
Published on: August 13, 2023 13:16 PM
views 365  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गामध्ये टॅलेंट आहे आणि ते टॅलेंट बाहेर यावं आपल्या जिल्ह्यातील मुलांना चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावा डॉक्टर इंजिनियर तसेच  वैज्ञानिक क्षेत्रात मुलं पुढे यावी त्यासाठी विद्यार्थ्यांना विज्ञान शिकवणाऱ्या शशिकांसाठी तीन दिवसीय विज्ञान प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन कणकवली विद्या मंदिर हायस्कूल येथे  सावंत फाउंडेशन यांच्यावतीने करण्यात आले होते

यावेळी जेष्ठ पत्रकार  विजय शेट्टी शात्रज्ञ डॉ. दामोधर प्रभू आणि डॉ. जोहार  अतारी मुख्याध्यापक  श्री कांबळी, पर्यवेक्षिका श्रीमती जाधव मॅडम कोकणसाद लाईव्ह मार्केटिंग हेड  समीर सावंत ,सावंत फौंडेशन चे सचिव शरद सावंत सावंत फौंडेशन खजिनदार श्रीकांत सावंत सहाय्यक ओंकार परब उपस्थित होते 

ज्येष्ठ पत्रकार विजय शेट्टी यांनी प्रयोगातील विज्ञान या ही संकल्पना खूप चांगली आहे भविष्यात अशाच पद्धतीने सावंत फाउंडेशनने जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी अशी प्रशिक्षण आयोजित करावी आणि शिक्षकांच्या ज्ञानात भर टाकावी जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक जास्त मिळेल आणि त्यातून ते विद्यार्थी घडू शकतील असे शेट्टी यांनी सांगितले

सावंत फाउंडेशनचे खजिनदार श्रीकांत सावंत त्यांनी सांगितले की कै. डॉ रमेश सावंत यांचा मानस होता. की आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या मुलांसाठी आपण काहीतरी करावे म्हणून आम्ही त्यांच्या हे विज्ञान प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहेत भविष्यात कुडाळ मालवण वैभववाडी देवगड पूर्ण जिल्ह्यामध्ये आपण अशी शिक्षकांची प्रदर्शन घेणार आहोत. आजच्या या तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला 30 शिक्षक या प्रशिक्षणाला उपलब्ध होते त्यामुळे हेच शिक्षक उद्या उद्याचे वैज्ञानिक घडवणार आहेत. त्यामुळे त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आम्ही शुभेच्छा देतो असे सावंत यांनी सांगितले

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदर्शन शर्मिला केळुसकर यांनी केले. व आभार प्रदर्शन शरद सावंत यांनी मांडताना सांगितले की हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमचे प्रायोजक INDOCO REMEDIES LTD. सुमती संगोपन सह प्रायोजक साईटेक लॅब लिमिटेड आणि सावंत बंधू , आप्तेस्ट आणि मित्र परिवार व स्थानिक सहकारी यांनी खूप मेहनत घेतली त्यामुळे त्या सर्वांचे आभार सावंत यांनी मानले