
सावंतवाडी : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यांचेबरोबर पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमांमध्ये हजर राहून पक्ष विरोधी काम केल्याबद्दल भाजपा कार्यकर्ते गुरुनाथ मठकर यांना भाजपाचे सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
त्यांनी मठकर यांना बजावलेल्या नोटीसीत म्हटलंय की, आपण भारतीय जनता पार्टीचे सक्रिय सदस्य आणि प्राथमिक सदस्य आहात. परंतु आज आपण शिवसेना कार्यालयामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब यांचा बरोबर पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमांमध्ये हजर असलेले दिसून येतात. याचा अर्थ असा होतो की, आपण पक्षाशिस्तीचे भंग केलेला आहे. त्यामुळे आपल्याला पक्षातून का काढून टाकण्यात येऊ नये? याचा सविस्तर खुलासा ७ दिवसा मध्ये सादर करावा. अशी कारणे दाखवा नोटीस भाजपाचे सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर गुरुनाथ मठकर यांना बजावली आहे.