कणकवली ठाकरे गट सेनेची नरकासुर स्पर्धा

ठाकरे गट युवा सेनेच्या नरकासुर स्पर्धेला उत्सुत प्रतिसाद
Edited by: उमेश बुचडे
Published on: October 25, 2022 11:48 AM
views 331  views

कणकवली - : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व युवा सेनेच्यावतीने आयोजित केलेल्या नरकासुर स्पर्धा स्पर्धेत तेजस राणे मित्रमंडळ कणकवली व जागृत मित्रमंडळाला विभागून प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक (विभागून) महापुरुष मित्रमंडळ व पटकीदेवी मित्रमंडळाने प्राप्त केला. तृतीय क्रमांक (विभागून) आंबेआळी मित्रमंडळ वभालचंद्र मित्रमंडळाने प्राप्त केला. मधीलवाडी मित्रमंडळ निम्मेवाडी मित्रमंडळ, सुदर्शन मित्रमंडळ, नवयुग मित्रमंडळाने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले. या स्पर्धेत शहरातील १९ संघांनी सहभाग घेतला होता.


उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने बाजारपेठ संदेश पारकर घरासमोर या नरकासुर स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक तथा नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, तेजस राणे, वैभव मालंडकर, योगेश मुंज, माजी नगरसेवक प्रसाद अंधारी, युवा सेनेचे शहरप्रमुख आदित्य सापळे, सौरभ पारकर, महेश कोदे, साई कोदे, जय शेट्ये, वाळके यांच्यासह शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.


नरकासुर स्पर्धेत शहरातील विविध संघांनी आक्राळविक्राळ नरकासुर प्रतिकृती तयार केल्या होत्या. या प्रतिकृती पाहण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. स्पर्धेचे परीक्षण सुहास वरुणकर, प्रा. हरिभाऊ भिसे यांनी केले. स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन बाळू वालावलकर यांनी केले.