
सावंतवाडी: यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलचा 'इन्व्हेस्टीचर समारंभ' आज मोठ्या उत्साहात पार पडला. प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थी प्रतिनिधींनी पदाची शपथ घेऊन स्वतःच्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या. प्राथमिक विभागात हेडबॉय म्हणून यश्मित ठाकूर तर हेड गर्ल म्हणून क्रिसॅन पाटील यांची निवड झाली. हाऊस कॅप्टन व व्हाईस कॅप्टन म्हणून पृथ्वी हाऊसमध्ये सुची सावंत व आर्यन कणसे, अग्नि हाऊसमध्ये कृष्णा चौधरी व रचित ठाकूर, जल हाऊसमध्ये राधेश नाईक व स्पृहा सितावर, तर वायू हाऊसमध्ये हर्षद वरसकर व धनेश सुराणा यांची निवड झाली.
माध्यमिक विभागात हेडबॉय म्हणून अब्दुर रेहमान तर हेड गर्ल म्हणून अद्विता संजय दळवी यांची निवड झाली. डिसिप्लिन हेड बॉय भव्य गौतम पटेल, हेड गर्ल स्वरा शरद धुरी, सचिव मानस आनंद जानकर, संयुक्त सचिव शर्व नीरज देसाई, स्पोर्ट्स कॅप्टन बॉय मंथन अच्युत सावंतभोसले, कॅप्टन गर्ल श्रीया समीर वंजारी, सांस्कृतिक सचिव अभिराज प्रसन्न कुडतरकर व संयुक्त सचिव म्हणून विधी साईनाथ वेटे यांची निवड झाली. हाऊस कॅप्टन व व्हाईस कॅप्टन म्हणून पृथ्वी हाऊसमध्ये लिसा लुईस मेंडिस व निश्का परिमल नाईक, अग्नि हाऊसमध्ये वैष्णवी मनोहर जाधव व आरुष अमोल चव्हाण, जल हाऊसमध्ये साची शिवकुमार उचगावंकर व गौरव आनंद वारंग, तर वायू हाऊसमध्ये स्पर्श लक्ष्मण धुरी व प्रज्ञेश प्रदीप बर्गे यांची निवड झाली.समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले होते. व्यासपीठावर अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंत भोसले, सचिव संजीव देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी ले.कर्नल (नि.) रत्नेश सिन्हा, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, मुख्याध्यापिका प्रियंका डिसोजा व उपमुख्याध्यापिका अवंतिका नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. क्रेसिडा डिसोजा व सोनाली शेट्टी यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापिका प्रियंका देसाई यांनी विद्यार्थ्यांना पदग्रहण शपथ दिली.
ले.कर्नल रत्नेश सिन्हा यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना म्हटले की, “ज्यांची निवड झाली नाही आणि ज्यांना अशी जबाबदारी घेण्याची इच्छा आहे त्यांना भविष्यात भरपूर संधी मिळणार आहेत. जीवनात आपले कर्तृत्व दाखवण्याची संधी वेळोवेळी मिळत असते, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने आपली कामगिरी उंचावण्यावर भर द्यावा.” ते पुढे सांगितले की, "देश-विदेशातील अनेक शाळा आपण पाहिल्या आहेत. YBIS ही खरोखरच आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत सक्षम वातावरण निर्माण करत आहे.” अच्युत सावंत भोसले यांनी विद्यार्थ्यांच्या शिस्तीचे कौतुक करताना म्हटले की, “मुलांमधील नेतृत्वगुणांच्या विकासासाठी ही पदे निश्चितच उपयुक्त ठरतील. शाळेच्या प्रत्येक उपक्रमात तुमची सक्रियता आणि जबाबदारी जाणवली पाहिजे. पद ही फक्त ओळख नाही, तर सेवाभावाची एक संधी आहे. तुम्ही घेतलेले निर्णय इतरांसाठी प्रेरणादायी ठरले पाहिजेत.” समारंभाला पालक वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने झाली. आभार प्रदर्शन वीणा राऊळ यांनी केले.