
सिंधुदुर्गनगरी : एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प देवगड अंतर्गत अंगणवाडी मदतनीस ही पदे भरण्यात येणार आहे. सदरची पदे ग्रामपंचायत नाडण, कट्टा, नारिंग्रे, किंजवडे, खुडी व मुटाट या महसूल गाव क्षेत्रातील अंगणवाडीमध्ये प्रत्येकी 1 पद भरण्यात येणार आहे. अंगणवाडी मदतनीस याचे देय होणारे एकूण मानधन रुपये 7 हजार 500 इतके असून महसूल गाव क्षेत्रातील इच्छुक व पात्र महिला उमेदवाराकडून दि. 11 नोव्हेंबर, 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प देवगड येथे स्विकारण्यात येणार असल्याचे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प देवगडचे बाल विकास प्रकल्प अधिकारी बाबली होडावडेकर यांनी कळविले आहे.
दिनांक 1 नोव्हेंबर, 2025 रोजी सुट्टी दिवशी कार्यालय चालू राहील व अर्ज स्विकारले जातील तसेच इतर सार्वजनिक सुट्टया वगळून कार्यालयीन वेळेत अर्ज स्विकारले जाणार आहेत. अधीक माहितीसाठी संबंधित सरपंच, ग्रामपंचायत कार्यालय व बाल विकास प्रकल्प अधिकारी, प्रकल्प कार्यालय देवगड दूरध्वनी क्रमांक 02364-262312/8975246026 येथे संपर्क साधावा.
 
 
    
                    
   


 
 
      
   
   
  
 
  
  
  
  
  	
   
   



 
 
               





 
       
       
       
       
      