डॉ. दुर्भाटकरांच्या रिक्त जागेवर दोडामार्गाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ऐवाळे यांची नियुक्ती

Edited by: विनायक गावस
Published on: June 28, 2023 19:59 PM
views 119  views

सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांच्या सेवानिवृत्तीनंतर रिक्त झालेल्या जागेवर दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे हे गेली २७ वर्षे या जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी दोनवेळा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ म्हणून काम केले आहे.

डॉ. ऐवाळे यांच्या नियुक्तीसाठी माजी नगरसेवक सुरेश भोगटे, माजी नगरसेवक विलास जाधव जीवनरक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी पाठपुरावा केला होता.