दशावतारी कलावंत शांती कलिंगण यांचे निधन

शांती कालिंगण दशावतारी नटसम्राट कै. सुधीर कलिंगण यांचे पुतणे
Edited by: गुरुप्रसाद दळवी
Published on: October 10, 2022 13:09 PM
views 2034  views

कुडाळ : दशावतारी कला क्षेत्रात आपल्या अभिनयासाठी प्रसिद्ध असलेले शांती कलिंगण यांचे आज अल्पशा आजाराने गोवा येथे रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले. शांती कलिंगण हे दशावतारी नाटकांमध्ये खलनायकी भूमिका अप्रतिम पद्धतीने साकारत. त्यांच्या निधनाने दशावतारी कलेचे मोठे नुकसान झाले आहे. शांती कलिंगण हे दशावतारी नटसम्राट कै. सुधीर कलिंगण यांचे पुतणे तर दशावतारी कलाकार आबा कलिंगण यांचे बंधू होत. तर दशावताराचे भीष्माचार्य बाबी कलिंगण यांचे ते नातू होत. शांती यांनी ब्रम्हराक्षस, जंबू राक्षस, रावण, गरुड, शेषनाग या भूमिका साकारल्या होत्या.