सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर

भोसले इंटरनॅशनल स्कूलचा सलग तिसऱ्या वर्षी 100% निकाल
Edited by: विनायक गांवस
Published on: May 13, 2024 12:02 PM
views 449  views

सावंतवाडी : केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल आज दुपारी जाहीर करण्यात आला. येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलने आपली यशस्वी परंपरा कायम ठेवत सलग तिसऱ्या वर्षी 100 निकाल देण्यात यश मिळवले. शाळेमधून एकूण 42 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यापैकी 90 टक्क्याहून अधिक गुणांच्या ए-वन श्रेणीत 7 विद्यार्थी, 80 टक्क्यांहून अधिक गुणांच्या ए-टू श्रेणीत 10विद्यार्थी व 70 टक्क्यांहून अधिक गुणांच्या बी-वन श्रेणीत 13 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी  आर्यन हिर्लेकर 95.33, ऋतुजा गावडे 93.83, ऋषी लेले 93.33, तन्मय कुमार 92.33, शौनक नर 92.17, स्वरांगी आंगचेकर 92.17 , विराज सावंत 91.83 व जान्हवी देसाई 90.33. टक्के ठरले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंत भोसले, सचिव संजीव देसाई, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, मुख्याध्यापिका प्रियंका देसाई डिसोजा यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.